आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी शोभन आणि वर्धमान नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन आणि मोठ्या लोकांच्या मदत मिळेल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ३
कार्यक्षेत्रात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य देणे गरजेचे. दैवाची साथ आहेच.

वृषभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
आत्मविश्वासाने विपरित परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरू नका. सासरवाडीकडून काही लाभ होतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ७
कारण नसताना इतरांच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण, तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. आज प्रवासात खोळंबा होईल.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : २
इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. मामा-मावशीकडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ८
तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. आज तुमच्यातील नेतृत्व गुणांस वाव मिळेल.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसौख्य लाभेल.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. कुटुंबीयांसाठी वेळ देणे कठीण जाईल. आज अत्यंत व्यस्त दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा|अंक : ५
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयांत तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल.

धनु : शुभ रंग : आकाशी|अंक : १
हट्टीपणास आवर घालून संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल.

मकर : शुभ रंग : निळा|अंक : २
आज संमिश्र फळे देणारा दिवस आहे. आवक पुरेशी राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.दिवस लाभाचा असून अवघड कामे सोपी होतील.

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील. गृहिणींना उसंत नाही.