आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 23 एप्रिल 2021 रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ७
घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून बराचसा वेळ कुटुंबीयांसहीत व्यतीत कराल.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ५
रिकामपणीच्या गप्पा टाळा, कारण त्यातून निष्पन्न काही होणार नाही. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी|अंक : २
आवक मनाजोगती असेल. तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना समर्थपणे कराल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ३
टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत. काही देणीही चुकवावी लागतील. डोळ्यांची निगा राखा.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : १
जिवलग मित्र हिताचे सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आज इच्छापूर्तीचा दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

मकर : शुभ रंग : पांढरा|अंक : ९
शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. अहो, ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे लक्षात ठेवा.

मीन : शुभ रंग : मोतिया|अंक : ८
एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. येणी वसूल होतील.

बातम्या आणखी आहेत...