आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 25 डिसेंबरला अश्विनी नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. शुक्रवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल. मात्र एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : २
सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. आशादायी दिवस.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ७
नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आक्रमकतेने निराशा होईल.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ६
आवक पुरेशी असेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांचे मूड सांभाळणे कठीण होईल. येणी मात्र वसूल होतील.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. गृहिणी स्वत:साठी आवर्जून वेळ काढतील.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ३
स्वत:च्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : १
व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. कामाचे तासही वाढवावे लागतील. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावीत.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
व्यावसायिक उलाढाल वाढेल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा होईल. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

बातम्या आणखी आहेत...