आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार 26 मार्च रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...
मेष: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. रागाऊन निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.
वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.
मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. नेतृत्व गाजवाल.
कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : २
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज सरकार दरबारी कामे रखडणार आहेत. दानधर्म कराल.
सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.
कन्या : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.
तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.
वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. घरी जोडीदाराच्याही भावना समजून घेणे हिताचे आहे.
धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
आज काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.
मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३
आज नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेणार अाहेत. वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होणार आहेत. आज तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.
मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. देण्याघेण्याच्या व्यवहारात फसवणूक.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.