आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.

वृषभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको.

सिंह : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तब्येत नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील.

तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : १
व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. सतर्क रहा.

धनु : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. थकवा जाणवेल.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.

बातम्या आणखी आहेत...