आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी अश्विनी नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : आकाशी| अंक : २
आज तुमची तब्येत जरा नरमच राहील. मानसिक स्थिती कमकुवत असेल. आज कोणतीच रिस्क घेऊ नका.

वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये वितुष्ट संभवते.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
जिवाची मुंबई करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : मरून| अंक : ५
नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकीनऊ येतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ४
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. वरिष्ठांशी नमते व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
कुसंगतीपासून लांबच राहा. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील.

तूळ : शुभ रंग : क्रीम|अंक : ८
काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल.वैवाहिक जीवनात लाडिक रुसवेफुगवे असतील.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावू शकतो.

धनु : शुभ रंग : केशरी|अंक : ४
महत्त्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत.

कुंभ : शुभ रंग :चंदेरी|अंक : ८
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहिणींना जाहिराती भुरळ घालतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser