आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 28 मे रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ८
मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने आत्मिक बळ वाढेल. आज सत्संगाची गरज.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ७
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास नकाे. काही हरवले असल्यास गवसेल.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ८
कार्यक्षेत्रात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीचेही मूड सांभाळाल.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. अपेक्षित मेल्स येतील.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
कौटुंबिक वाद दुपारनंतर ते सुसंवादाने मिटवता येतील. आज तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञा पाळतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ४
तुमचे मनोबल उत्तम राहील. सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.

बातम्या आणखी आहेत...