आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार, 29 जानेवारी रोजी पौष मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून आजच्या दिवशी आश्लेषा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शुक्रवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...
मेष: शुभ रंग : मरून | अंक : ६
आज धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल.
वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ४
कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.
मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : १
काम कमी व धावपळच जास्त होईल. महत्वाची कामे रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती आफत होईल.
सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ९
व्यापार उद्योगात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. वाद टाळा.
कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हाल. घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वाणीत मृदुता ठेवा.
तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल. दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील.
वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६
व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधतेने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे.
धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३
काही क्षुल्लक अडचणी मन:स्वास्थ्य बिघडवतील. घरात वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.आज भावना व कर्तव्य याचा ताळमेळ साधणे कठीण जाईल.
मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २
कोणत्याही क्षेत्रात असलात तरी काही चढाओढीचा सामना करावाच लागेल. जुन्या अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल.
कुंभ : शुभ रंग : लाल | अंक : ४
महत्वाच्या चर्चा व बैठकी यशस्वी होतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल. वैवाहीक जोडीदाराशी छान सूर जुळतील. मस्त दिवस.
मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १
कार्यक्षेातील वाढत्या व्यस्ततेमुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कदाचित जोडीदाराची नाराजी पत्करावी लागेल. मोहापासून दूर रहा, प्रतिष्ठेस जपा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.