आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार 29 मे रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
मेष: शुभ रंग : लाल | अंक : ३
आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येणार आहेत.
वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
आज कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. आज मुलांच्या अभ्यासात लक्ष घालणेही अवश्यक आहे.
मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या सामाज हिताच्या कामात लक्ष घालाल. गृहीणींना आज उसंत नाही. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील.
कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ८
धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. वादविवादात आपल्याच मतावर अडून राहता येईल.
सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
तुम्ही काहीसे संवेदनशील असाल. एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल. तब्येत नरमच असेल.
कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : १
विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. अनावश्यक खर्च कमी करा.
तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
प्रकृती ठणठणीत असल्याने प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
कष्टांचाही अतिरेक नकाे. ध्येयाच्या मागे धावताना तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळा.
धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
तुम्हाला पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागतील. सज्जनांच्या सहवासात रमाल. भक्तीमार्गात गोडी वाटेल.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : ५
सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.
कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. आज पत्नीचे उपदेश ऐकून घेणे गरजेचे.
मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील वसूलीची शक्यता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.