आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी रेवती नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकलेली बरी. काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. आज संध्याकाळी प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

कर्क : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ७
वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
भागीदारी व्यवसायात तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतील. देण्या-घेण्याचे व्यवहार चोख असावेत.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे नि:स्वार्थीपणे कराल. जोडीदाराशी दुपारनंतर सुसंवाद.

तूळ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झकाली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे. मुले आज्ञेत राहतील

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम|अंक : २
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी आज कराल.

धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावू नका.

मकर : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
आवक पुरेशी असली तरी खर्च करताना जपूनच करा. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवणार आहे.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

मीन : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
व्यवसायातील वाढती स्पर्धा बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे.