आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी आद्रा नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : निळा | अंक : २
नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने मनावर घेऊ नका. महत्वाच्या कामासाठी भ्रमंती होईल.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ९
आज आर्थिक अडचण दुपारनंतर अकस्मिकरीत्या दूर होईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. आप्तस्वकीय तुमच्याशी जवळीक साधतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. विद्यार्थ्याना अभ्यासाचे ओझे वाटेल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. आज काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. वाद टाळलेले बरे.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.

कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ५
नोकरी व्यवसायात आज उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंबंध जुळून येतील. काही येणी वसूल होतील. प्रेमवीरांनी संध्याकाळी न भेटलेलेच बरे.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८
कोणतीही गोष्ट सहज साध्य होईल या भ्रमात राहू नका.ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
काही महत्वाची कामे असतील तर आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्यावीत. आज वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेफार मतभेद संभवतात. शांत रहा.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
काही मनाविरूध्द घटना घडतील. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. आज तुमचा देवधर्माकडे कल राहील. विश्रांतीची गरज भासेल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २
आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ४
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात अधिकारात वृध्दी होईल. संध्याकाळी करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. अनपेक्षित लाभ होईल.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
अनावश्यक खर्चात कपात करून बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी काही मोठे खर्च उद्भवतील. अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...