आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रह गोचर:2 जून रोजी मंगळ बदलणार राशी, आता कर्कमध्ये आल्यामुळे 6 राशींसाठी अशुभ तर 4 राशींसाठी शुभ

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 2 जून रोजी मंगळ आपली नीच राशी म्हणजे कर्कमध्ये प्रवेश करेल. या राशीमध्ये मंगळ 20 जुलैपर्यंत राहील. याचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. मंगळाचा प्रभाव युद्ध, भूमी, साहस, पराक्रम आणि बिझनेसवरही पडतो. यसोबतच हा ग्रह वैवाहिक जीवन, भौतिक सुख-सुविधा आणि यशामध्येही अडथळे निर्माण करतो. मंगळाचे राशी परिवर्तन 4 राशींसाठी शुभ तर 6 राशींसाठी अशुभ राहील. इतर 2 राशींवर संमिश्र प्रभाव राहील.

भविष्यवाणी : सोने-चांदी किंमत आणि शेअर बाजार वाढेल
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात. रेशमी कपडे, प्लास्टिक आणि रासायनिक गोष्टींचाही किंमती वाढण्याचे योग जुळून येत आहेत. शेअर बाजारात चढ-उतारानंतर तेजी येईल. यंत्र सामग्री मशिनरी महाग होऊ शकते. या व्यतिरिक्त खाद्य पदार्थांचे भाव कमी होऊ शकतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी हा काळ सामान्य राहील.

मंगळ ग्रहामुळे हवाई किँवा पाण्याशी संबंधित दुर्घटना होण्याची शक्यता आहे. देशातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस राहील. भूकंप किंवा इतर नैसर्गिक संकट येण्याची शक्यता आहे. प्रशासनिक फेरबदल होऊ शकतात. देशाची कायदा व्यवस्था मजबूत होईल. नौदलाची ताकद वाढेल.

कुंभ सहित 4 राशींसाठी चांगला काळ
मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ राशीसाठी हा काळ चांगला राहील. या राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये बढतीची संधी मिळू शकते. इतर कामातही नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये लाभ होण्याचे योग आहेत. आरोग्यासाठीही काळ चांगला राहील. मंगळाच्या प्रभावाने जुन्या अडचणी आणि वादातून मुक्ती मिळू शकते.

मकरसहित 6 राशींसाठी अशुभ काळ
मंगल नीच राशीमध्ये आल्यामुळे मेष, मिथुन, कर्क, सिंह, धनु आणि मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या सहा राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये सांभाळून राहावे लागेल. तणाव आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. धनहानी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कर्ज घेऊ नये.

वृश्चिक आणि मीन राशीसाठी संमिश्र फळ देणारा काळ
मंगळाच्या प्रभावामुळे वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना संमिश्र फळ देणारा राहील काळ. या 2 राशीच्या लोकांना काही बाबतीत नशिबाची साथ मिळू शकते. फायदाही होईल. परंतु कामामध्ये अडथळे आणि मनाविरुद्ध गोष्टींचा सामना करावा लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...