आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष | शुभ रंग :आकाशी, शुभ अंक : १
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज मनासारखा खर्च करता येईल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील.

वृषभ | शुभ रंग : पिस्ता, शुभ अंक : ९
आळस झटकून कामाला लागाल, पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. मित्र चुकीचा मार्ग दाखवतील. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे.

मिथुन | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. प्रयत्नांस दैव अनुकूल राहील.

कर्क | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.

सिंह | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
केवळ भिडस्तपणापायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

कन्या | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : १
काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. काळजी करू नका, पण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अावश्यक. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे नमतेच घ्यावे.

तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
आज तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. कलाकार संधींचे सोने करतील. नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.

वृश्चिक | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ३
गृहिणी आज घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल. प्रेमीयुगुलांनी तर आजच्या दिवस मौनव्रत ठेवणेच हिताचे राहील.

धनु | शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ८
वास्तू व वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

मकर | शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ६
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांचीही मने जिंकाल. आज दुरावलेले मित्र जवळ येतील.

कुंभ | शुभ रंग :लाल, शुभ अंक : ९
आपल्या कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य ते शक्य करून दाखवण्याची तुमची जिद्द राहील. विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

मीन | शुभ रंग : निळा, शुभ अंक : ७
घरात थोरांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. त्यांच्या वयाचा मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल, जो टाळता येणार नाही. आज वाद टाळा.

बातम्या आणखी आहेत...