आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 2 मार्च रोजी फाल्गुन मासातील मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून आजच्या दिवशी आद्रा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे गुरुवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : १
ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोक घालू नका. अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत ठरेल. काही अती हुशार मंडळी भेटतील. आज कमीच बोला.

वृषभ: शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल.

मिथुन : शुभ रंग:मरून, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दास मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

कर्क : शुभ रंग:नारिंगी, शुभ अंक : २
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्यास शब्द देऊ नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या, परमार्थ परवडणारा नाही.

सिंह : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्वाचे समाचार येतील.

कन्या : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करु शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देऊ शकाल.

तूळ : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
नाेकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा, संयम ठेवा. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

वृश्चिक : शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ९
आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मन:शांती मिळेल. आज धाडस नको.

धनू : शुभ रंग:तांबडा, शुभ अंक : ५
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागिदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे.

मकर : शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
नोकरदारांवर वरीष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच राहील. पतीपत्नीं मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

कुंभ : शुभ रंग:तांबडा, शुभ अंक : ३
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाचीही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधींचे सोने करतील.

मीन : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ६
व्यापर उद्योगास चांगली गती येईल. महत्वाच्या चर्चेत विरोधक नमते घेतील. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

बातम्या आणखी आहेत...