आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • मूळ नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात आहे

सोमवार 13 एप्रिल 2020 ला मूळ  नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून परीघ नावाचा योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावामुळे आजच्या दिवशी 6 राशीच्या लोकांना काहीशा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तर उर्वरीत 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. 


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : नारिंगी| अंक : ९

सरकार दरबारी रखडलेल्या कामांसाठी वशिला शोधावाच लागेल. अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. प्रतिकूल दिवस. 

  • वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ४

आज  विश्रांती गरजेची आहे. केवळ भिडस्तपणा पायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील.

  • मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ६

कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडी निवडी दुर्लक्षित होतील. रिकामटेकडया गप्पांतून वादविवाद निर्माण होतील. वैवाहीक जिवनांत जोडीदारास समजून घ्या. 

  • कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील.रुग्णांनी पथ्यपाणी पाळणे गरजेचे आहे. काही येणी असल्यास वसूल होऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश. 

  • सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : १

कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील.चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वत:च्या आवडी निवडीस प्राधान्य द्याल. 

  • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

वास्तू व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कलेच्या क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व कळेल. 

  • तूळ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३

प्रॉपर्टी खरेदी विक्रिचे व्यवहार टाळलेले बरे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. कामाच्या व्यापात कुटुंबियांना वेळ देणे अशक्य होईल. 

                 

  • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ५

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आज आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्वाच्या वाटाघाटीत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकाल.

  • धनू : शुभ रंग : मोतिया| अंक : ४

आळस झटकून कामाला लागाल, परंतू अती उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल असलेला पैसा जपून वापरा. कुणाला शब्द  देऊ नका. 

  • मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ८

काम सोडून काही निरर्थक वादविवादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. आज आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. प्रवासात झोपून चालणार नाही. 

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

दुरावलेले नातलग एकत्र येतील. मित्र अश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभच चिंता. दैव तुमच्याच बाजूने. 

  • मीन : शुभ रंग : मरून | अंक : ६

भावना व कर्तव्य याचा समन्वय साधावा लागणार आहे. कामाच्या ठीकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. आज संयम ढळू देऊ नका.

0