आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 नोव्हेंबरला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण:सुतक काळात करू नये पूजा-पाठ, राशीनुसार करावे दान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी आहे. या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. यामुळे सुतक राहील. सुतक काळात मंदिरे बंद असतात आणि सर्व प्रकारची पूजा करण्यास मनाई असते. भारतात ग्रहण दुपारी 2.41 वाजता सुरू होईल. सायंकाळी 6.20 पर्यंत हे ग्रहण सुरू राहणार आहे. चंद्रग्रहणाचे सुतक ग्रहण सुरू होण्याच्या ठीक 9 तास आधी सुरू होते आणि ग्रहण संपल्यानंतर सुतकही संपते.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या काळात राशीनुसार दान केले तर कुंडलीतील अनेक दोषांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

मेष - गहू, जमीन, मसूर डाळ, लाल वस्त्र, लाल गाय, गूळ, चंदन, लाल फुले, सोने, तांबे, केशर, दान करावे.

वृषभ- हे लोक तांदूळ, साखर, हिरा, चांदी, मोती, पांढरे वस्त्र, तूप, सोने दान करू शकतात.

मिथुन- काशाची भांडी, हिरवे वस्त्र, तूप, पैसा, पाचू, सोने, सर्व प्रकारची फुले, कापूर, शंख, फळे, अन्न दान करू शकतात.

कर्क- तांदूळ, पांढरे वस्त्र, चंदन, फुले, साखर, चांदी, पांढरा बैल, तूप, शंख, दही, मोती आणि कापूर यांचे दान करू शकता.

सिंह- गहू, माणिक, गाय, कमळाचे फूल, लाल चंदन, लाल वस्त्र, सोने, तांबे, केशर, गुंज यांचे दान करू शकता.

कन्या- काशाची भांडी, हिरवे वस्त्र, तूप, पैसा, पाचू, सोने, फुले, कापूर, शंख, फळे, अन्नदान करा.

तूळ- तांदूळ, साखर, हिरा, चांदी, मोती, पांढरे वस्त्र, तूप, सोने दान करा.

वृश्चिक- तुम्ही जमीन, मसूर, लाल वस्त्र, गूळ, चंदन, फुले, सोने, तांबे, केशर दान करू शकता.

धनु- धान्य, पिवळे कपडे, सोने, तूप, पिवळी फळे, पुष्कराज, हळद, पुस्तके, पैसा, मध, साखर, मीठ, जमीन दान करू शकता.

मकर- तेल, सप्तधान्य, नीलम, तीळ, निळे कपडे, घोंगडी, लोकरीचे कपडे, सोने, उडीद दान करू शकता.

कुंभ- या राशीच्या लोकांनी तेल, सात प्रकारचे धान्य, नीलम, तीळ, निळे आणि काळे कपडे, ब्लँकेट, लोकरीचे कपडे, सोने दान करावे.

मीन- पिवळे कपडे, धान्य, सोने, तूप, पिवळी फळे, पुष्कराज, हळद, पुस्तके, पैसा, मध, साखर, मीठ दान करू शकता.

बातम्या आणखी आहेत...