आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरायण पर्व:देशाच्या बहुतांश भागात आज मकर संक्रांती साजरी केली जात आहे, सन 2077 पासून, हा सण 15 किंवा 16 जानेवारीलाच येणार

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या वेळेबाबत मतभेद आहेत. त्यामुळे काही ठिकाणी 14 जानेवारीला तर कुठे 15 जानेवारीला मकरसंक्रांती साजरी होणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये संक्रांती 14 जानेवारीलाच साजरी केली जाते. संक्रांती साजरी करण्याचा निर्णय सूर्याने राशी बदलल्यापासून घेतला जातो. त्यामुळे या उत्सवाच्या तारखांमध्ये बदल होते. यामुळेच 2077 पासून हा दिवस 14 नाही तर 15 आणि 16 जानेवारीला साजरा केला जाणार आहे.

मकर संक्रांती १४ तारखेलाच साजरी करणे योग्य
खगोलशास्त्र विज्ञान केंद्रातून प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय पंचांगानुसार, सूर्य 14 जानेवारी रोजी दुपारी 02:30 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे स्नान आणि दानाचा हा सण आज साजरा केला पाहिजे. त्याचवेळी वाराणसी, उज्जैन आणि इतर शहरांच्या पंचांगानुसार १४ जानेवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास सूर्य आपली राशी बदलेल. या कारणास्तव काही लोक 15 तारखेला स्नान-दान आणि पूजा करतील. परंपरेनुसार स्थानिक पंचांगानुसार हा सण दोन्ही दिवशी साजरा केला जाऊ शकतो, असे ज्योतिषी सांगतात.

सूर्य दरवर्षी 20 मिनिटे उशिराने मकर राशीत प्रवेश करतो
पं मिश्रा यांच्यानुसार, सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजे मकर संक्रांती म्हटले जाते. सामान्यतः प्रत्येक वर्षी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीमध्ये 20 मिनिट उशिराने प्रवेश होतो. अशाप्रकारे प्रत्येक तीन वर्षांनी सूर्य एक तासाने आणि प्रत्येक 72 वर्षात एक दिवस उशिराने मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यानुसार सन् 2077 नंतर 15 जानेवारीलाच मकर संक्रांती साजरी केली जाईल.

  • का साजरी केली जाते मकरसंक्रांती, जाणून घ्या 5 आवश्यक गोष्टी 1) ज्योतिष दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांती अत्यंत खास सण आहे. धर्मग्रंथांमध्येसुद्धा या सणाचा उल्लेख आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि यासोबतच उत्तरायण सुरु होते. हा शुभकाळ मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी गेले होते, यामुळे हा दिवस सुख-समृद्धीचा दिवसही मानला जातो. या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. यामुळे मकरसंक्रांतीला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

2) संस्कृतीनुसार
भारतामध्ये सांस्कृतिक विविधतांमध्ये मकरसंक्रांतीचेसुद्धा एक विशेष महत्त्व आहे. देशातील अनेक भागांमध्ये हा सण साजरा केला जातो परंतु प्रत्येक राज्यात या सणाचे नाव आणि प्रथा वेगवेगळ्या आहेत. उदा. देशातील दक्षिणेकडील राज्य केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये या सणाला फक्त संक्रांती म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हटले जाते आणि येथे चार दिवस हा सण साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणामध्ये या सणाला लोहडी म्हटले जाते. आसाममध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकरसंक्रांती म्हटले जाते.

3) खान-पान आणि दानाचेही विशेष महत्त्व
मकरसंक्रांतीला तिळाचे उटणे लावून स्नान केले करण्याची धार्मिक मान्यता आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक जमा होतात आणि यात्राही भारावली जाते. खिचडी बनवली जाते आणि तूप, गुळासोबत सहकुटुंब खाल्ली जाते. तीळ-गुळाचे लाडू या काळात खाल्ले जातात. तीळ, गूळ, खिचडी, छत्री आणि वस्त्र दानाचे विशेष महत्त्व या सणामध्ये आहे. महिला सौभाग्याशी संबंधित वस्तू दान करतात.

4) सूर्यदेवाची प्रसन्नता
स्नान आणि दान करण्यामागचे कारण म्हणजे यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि जीवन यशस्वी तसेच समृद्ध करतात. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर दान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकरसंक्रांतीला सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले होते यामुळे हा दिवस सुख आणि समृदीचा दिवस मानला जातो.

5) वसंत ऋतूची सुरुवात
मकरसंक्रांतीनंतर थंडी म्हणजेच हिवाळा ऋतू समाप्त होऊ लागतो आणि उन्हाचा प्रभाव वाढू लागतो. सूर्य उत्तरायण झाल्यामुळे असे घडते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. एकूणच वसंत ऋतूचे आगमन होते आणि वातावरण बदलते. मान्यतेनुसार महाभारतामध्ये भीष्म पितामह यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीचा प्राण त्याग केला होता.

बातम्या आणखी आहेत...