आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रहस्थिती:18 जूनला मंगळाने बदलली राशी आणि बुध झाला आहे वक्री, आता 25 जूनपर्यंत 9 पैकी 6 ग्रह राहतील वक्री, याच ग्रहस्थितीमध्ये होणार सूर्यग्रहण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनि मकर राशीत गुरुसोबत आहे वक्री, 25 जूनला शुक्र होईल मार्गी

गुरुवार 18 जूनला तीन ग्रहांची स्थिती बदलली आहे. चंद्राने वृषभ राशीमध्ये आणि मंगळाने मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे. बुध मिथुन राशीमध्ये वक्री झाला आहे. यासोबतच आता 9 पैकी 6 ग्रह वक्री झाले आहेत. रविवार 21 जूनला सूर्यग्रहण याच स्थितीमध्ये होईल. त्यावेळी चंद्र, सूर्य आणि राहुसोबत मिथुन राशीमध्ये राहील.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 6 वक्री ग्रहांची स्थिती 25 जूनपर्यंत राहील. 25 तारखेला शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये मार्गी होईल. त्यानंतर 12 जुलैपर्यंत 5 ग्रह वक्री राहतील. त्यानंतर बुध ग्रह मिथुन राशीमध्ये मार्गी होईल.

सूर्य, चंद्र आणि मंगळ राहतील वक्री

25 जूनपर्यंत बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहू-केतू वक्री राहतील. याव्यतिरिक्त सूर्य, चंद्र आणि मंगळ मार्गी राहतील. राहू-केतू नेहमीच वक्री राहतात आणि सूर्य-चंद्र नेहमी मार्गी राहतात. ग्रहांची ही स्थिती सर्व 12 राशींसाठी खास राहील. ज्योतिषमध्ये ग्रहांच्या दोन स्थिती सांगण्यात आल्या आहेत, एक मार्गी आणि दुसरी वक्री.

सर्व 12 राशींवर पडेल या ग्रह स्थितीचा प्रभाव

सध्या 12 ही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. धैर्य बाळगून काम करावे. ही ग्रहस्थिती मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ राशीसाठी शुभ राहील. वृषभ, कन्या, वृश्चिक राशीसाठी अशुभ राहील. मिथुन, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील.

बातम्या आणखी आहेत...