आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळाचे राशी परिवर्तन:21 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहील हा ग्रह, रिअल इस्टेट आणि उद्योगात तेजीचे संकेत

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

6 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करेल आणि 21 ऑक्टोबरपर्यंत याच राशीत राहील. जवळपास 46 दिवस मंगळ ग्रहाचा प्रभाव देश-जग आणि सर्व राशींवर पडेल. या राशी परिवर्तनामुळे हवामानात बदल घडतील. हा ग्रह जमीन, कर्ज, रक्त, सेना, पोलीस, क्रोध आणि उत्साह कारक ग्रह आहे. मंगळाच्या शुभ प्रभावाने यांच्याशी संबंधित शुभ फळ प्राप्त होतात.

मंगळावर राहूची दृष्टी आणि गुरुसोबत अशुभ योग
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, मंगळाचे बुधच्या राशीमध्ये येणे रिअल इस्टेट आणि उद्योग जगतामध्ये तेजीचे संकेत देत आहे. देशाच्या सुरक्षेवर पैसा खर्च होईल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री वाढेल. जमिनीच्या दरांमध्ये अचानक उतार-चढाव होऊ शकतात. मंगळावर राहूची दृष्टी असल्यामुळे देशाच्या काही भागात वाद, हिंसा, आंदोलने आणि अपघाताच्या दुर्घटना वाढू शकतात.

नैसर्गिक संकटांमध्ये भूकंप, चक्रीवादळ किंवा भूस्खलन होण्याचीही शक्यता आहे. गुरु-मंगळाच्या षडाष्टक योगामुळे धार्मिक वाद होतील. धार्मिक गुरूंसाठी हा काळ ठीक राहणार नाही. शिक्षणाशी संबंधित निर्णयांमुळे वाद वाढतील. संघर्ष, अस्वस्थता, रोग आणि त्रास होऊ शकतो. कावीळ, हृदयरोग, रक्तदाब आणि पोटाचे आजार लोकांमध्ये वाढू शकतात.

मेष, कर्क आणि वृश्चिक राशीसाठी शुभ
मंगळाच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव मेष, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर पडेल. या राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेससाठी चांगला काळ राहील. या व्यतिरिक्त वृषभ, धनु आणि मकर राशीवर मंगळाचा संमिश्र प्रभाव राहील. म्हणजेच यश तर मिळेल परंतु खर्च, धावपळ आणि मेहनतही करावा लागेल. या व्यतिरिक्त मिथुन, सिंह, कन्या, तूळ, कुंभ आणि मीन राशींवर मंगळाचा अशुभ प्रभाव राहील. या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

हनुमान उपासनेने कमी होईल अशुभ प्रभाव
मंगळाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी मध खाऊन घराबाहेर पडावे. लाल चंदनाचा टिळा लावावा. लाल फुल अर्पण करून हनुमानाची पूजा करावी. मंगळवारी तांब्याच्या भांड्यात धान्य भरून हनुमान मंदिरात दान करावे. मातीच्या भांड्यात जेवण करावे. मसुराची डाळ दान करावी. पाण्यामध्ये थोडेसे लाल चंदन टाकून स्नान करावे. या उपायांनी मंगळाचा अशुभ प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...