आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असून दुसरीकडे गुरू आणि शुक्र अस्त आल्याने यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ५३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत.
सध्या सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. अशातच दोन महिन्यांनी सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. काेराेनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत गुरू अस्त, तर यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत शुक्र अस्त असल्याने शुभ मुहूर्त नाहीत.
या वर्षी कमी शुभ तारखा यंदा कर्तव्य आहे असे समजणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ शुभ मुहूर्त आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी कमी शुभ तारखा आहेत. मनीषा कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
19 जानेवारी ते 21 एप्रिलपर्यंत यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्या झाल्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. सनई चौघडे वाजणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये २७, २८ यानंतर डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ अशा तारखा आहेत. २०२१ मध्ये जानेवारीत ३, ५, ६, ७, ८, ९,१०. फेब्रुवारीत १५, १६, यानंतर शुक्र अस्त आल्याने मार्चमध्ये लग्न तिथी नसून थेट एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१. जून महिन्यात ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८. जुलै महिन्यात १, २, ३, १३, अशा तारखा असून यंदा ५३ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत.
साखरपुड्याच्या तारखा
ऑक्टोबरमध्ये २, ४, ८, १३, १९, २१, २४, २८, २९, ३०, ३१, नोव्हेंबर महिन्यात ४, १२, १९, २०, २१, २४, २७, ३०, डिसेंबरमध्ये १, ७, ९, १०, १५, १७, १९,२२, २३, २४, २७ अशा तारखा आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.