आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष:नवरात्रोत्सवात साखरपुडा, तर नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त, यंदा एकूण 53 शुभमुहूर्त, मे महिन्यात सर्वाधिक 15 तिथी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा विवाहाचे एकूण 53 शुभमुहूर्त

आधी पितृपक्ष आणि आता अधिक महिना यामुळे दीड महिना विवाहसोहळ्यांना विराम मिळाला आहे. दरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असून दुसरीकडे गुरू आणि शुक्र अस्त आल्याने यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ५३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत.

दीड महिन्यांनंतर तिथी सुरू होणार असल्याने यंदा नवरात्रोत्सवात साखरपुडा, तर तुळशी विवाहानंतर रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. सध्या सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. अशातच दीड महिन्यांनी सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. काेराेनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत गुरू अस्त, तर यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत शुक्र अस्त असल्याने शुभ मुहूर्त नाहीत. दरम्यान, सर्वाधिक १५ लग्नतिथी मे महिन्यात आहेत.

विवाहासाठी मुहूर्त
१९ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्या झाल्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. सनई चौघडे वाजणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये २७, २८ यानंतर डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ अशा तारखा आहेत. तसेच, २०२१ मध्ये जानेवारीत ३, ५, ६, ७, ८, ९,१०, फेब्रुवारीत १५, १६, यानंतर शुक्र अस्त आल्याने मार्चमध्ये लग्न तिथी नसून थेट एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१, तसेच जून महिन्यात ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८, जुलै महिन्यात १, २, ३, १३, अशा तारखा असून यंदा ५३ शुभ मुहूर्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...