आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 एप्रिलला खरमास संपणार:सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल, या दिवशी नदी स्नान-दान करण्याची प्रथा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 एप्रिल, शुक्रवारी मेष संक्रांती आहे. या दिवशी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल आणि खरमास संपेल. खरमास संपल्याने लग्न, गृह प्रवेश, मुंडण यासारख्या शुभ कार्यांवरची बंदी हटणार आहे. आता या शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त उपलब्ध होणार आहेत. मेष संक्रांतीला नदीत स्नान करण्याबरोबरच दान-धर्म करण्याची परंपरा आहे. या सणाला सूर्यदेवाला जल अर्पण करून विशेष पूजा करावी.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्य एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. ज्या दिवशी हा ग्रह एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांती सण साजरा केला जातो. शुक्रवारी सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, म्हणून याला मेष संक्रांत म्हणतात. हा राशी बदल एप्रिलमध्ये होतो. 14 एप्रिल ते 15 मे या कालावधीत सूर्य मेष राशीत राहील.

मेष संक्रांतीला करू शकता हे शुभ काम
मेष संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. ज्यांना नदीत स्नान करणे शक्य नसेल त्यांनी घरात स्नानाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे.

स्नानानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना ऊँ सूर्याय नमः मंत्राचा जप करावा. त्यानंतर सूर्यदेवाची विशेष पूजा करावी. सूर्यदेवासाठी गुळाचे दान करावे.

संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर श्राद्ध, तर्पण इत्यादी शुभ कार्येही पितरांसाठी करावीत. दुपारच्या वेळी शेणापासून बनवलेली गोवरी जाळून त्यामधून धूर निघणे थांबले की, पितरांचे ध्यान करत त्यावर गूळ-तूप अर्पण करावे. तळहातात पाणी घेऊन पितरांना अंगठ्याकडून पाणी अर्पण करावे.

या दिवशी स्नान केल्यानंतर पूजा करून गरजूंना अन्नदान करावे. पैसे, धान्य, कपडे, बूट आणि चप्पल, छत्री, गूळ, गहू दान करू शकता.

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती चांगली नसेल, त्यांनी संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्य नऊ ग्रहांचा राजा आहे आणि त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने कुंडलीतील अनेक दोष दूर होऊन कामातील अडथळे दूर होतात.