आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 1 फेब्रुवारीची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
आज काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मामा-मावशीकडून काही सुवार्ता येतील.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : २
पारिवारिक सुखात वृद्धीच होईल. वाहन-वास्तुविषयी खरेदी-विक्री आज फायद्यातच राहील. तरुण मंडळी बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावायला हवी.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल. तरुणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे घात करतील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
ज्येष्ठांनी तीर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

सिंह : शुभ रंग : भगवा|अंक : ५
आज तुम्ही गरजूंना तत्परतेने मदत कराल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ७
क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तुमच्याकडून आपलीच माणसे दुखावली जातील. संयम बाळगा.

तूळ : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
मोठेपणासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. ध्येय साध्य होतील.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ८
प्रयत्नांना दैवाची उत्तम साथ मिळेल. अाध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना आज उपासनेचे फळ मिळेल.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
मोफत सल्लागार माणसे भेटतील. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नकाे. स्वावलंबन महत्त्वाचे.

मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने सुखावतील. धंद्यात भागीदारांशी एकमत राहील.

बातम्या आणखी आहेत...