आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोमवार, 1 मार्च रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...
मेष: शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
आवक मनाजोगती असून तुमची मन:स्थिती उत्तम राहील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.
वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.
मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : १
जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.
कर्क : शुभ रंग : निळा| अंक : ८
पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मित्रास मदत कराल.
सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : ७
आज इच्छापूर्तीचा दिवस असून. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. जोडीदाराशी एकमत राहील.
कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ९
आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकलेली बरी.
तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६
शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. नवीन ओळखीत व्यवहार नको.
वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना पगारवाढीच्या बातम्या येतील. ध्येय साध्य होतील.
धनू : शुभ रंग : भगवा| अंक :
५ सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. वाद टाळाच.
मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहे या भ्रमात राहू नका. जुळवून घ्या.
कुंभ : शुभ रंग : केशरी| अंक : २
चढ-उतारांचा सामना करावाच लागणार. वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.