आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 10 ऑगस्ट रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे. अनुभवी व्यक्तींचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ४
अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. दगदग होईल. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या. अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : २
योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्र खोटी अश्वासने देणार आहेत.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा.

कन्या : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचाही अतिरेक टाळा.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
रिकाम्या चर्चेतून वादच होतील. पत्नी जे म्हणेल त्यास हो म्हणाल तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारी दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्य पाळावे अन्यथा आजार बळावेल.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. कलाकारांना उत्तम संधी येतील.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत.

कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : २
कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी चर्चा सकारात्मक होतील.

0