आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 10 जानेवारी रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
अधिकारांचा गैरवापर टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : २
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : १
नोकरीच्या ठीकाणी आज वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. अती आक्रमकतेने नुकसान होऊ शकते.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ८
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत, नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊन चालणार नाही.

तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
कौटुंबिक सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आज चांगला दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. गृहीणींना थोडा थकवा जाणवेल.

धनु : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. चैन कराल.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आवक उत्तम

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८
जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहीणींना आज शेजारधर्म पाळावे लागतील.

मीन : शुभ रंग : भगवा| अंक : ३
उध्दटपणास लगाम असावा. आवक पुरेशी असली तरी आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

बातम्या आणखी आहेत...