आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • दोन अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात

11 मे, सोमवारी पूर्वाषाढा नक्षत्र आणि धनु राशीतील चंद्रामुळे ग्रहण आणि उत्पात नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. यांच्या प्रभावाने काही लोकांनी दिवस तणाव आणि वादाचा ठरू शकतो. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहार अडकू शकतात. 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

  • वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : २

नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध राहायला हवे. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

  • मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

  • कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : १

रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

  • सिंह : शुभ रंग : लाल | अंक : २

घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

  • कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ६

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

  • तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

नकळत झालेल्या चुकांमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून काही सुचेल.

  • वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ५

आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

  • धनू : शुभ रंग : हिरवा| अंक : ४

आवक मनाजोगती असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

  • मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६

टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.

  • मीन : शुभ रंग : निळा | अंक : ३

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...