आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 12 एप्रिल रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : ५
रिकामटेकड्या चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. खर्च वाढेल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. व्यस्त दिवस.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशीही जुळवून घ्या.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : १
कुसंगतीपासून लांबच राहा. नितिबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावू शकतो.

वृश्चिक : शुभ रंग : नारिंगी|अंक : ६
महत्त्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेला पैसा पुरवून वापरावा.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ९
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज स्थावर खरेदी व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : क्रिम|अंक : ९
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. चैन कराल.

मीन : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आज आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति आत्मविश्वास नुकसानीस कारणीभूत होईल.

बातम्या आणखी आहेत...