आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 12 ऑक्टोबर रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
कौटुंबिक स्तरावर काही चांगल्या घटना घडतील. प्रेमप्रकरणे मात्र नसता मनस्तापच देतील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.थोडा संयम ठेवा. आज प्रवास कार्यसाधक होईल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा विरोध कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क : शुभ रंग : भगवा|अंक : ५
तुमचे मनोबल उत्तम असेल. तुमची सकारात्मकता सहकाऱ्यांना प्रभावित करेल. चांगली बातमी कळेल.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ६
दैनंदिन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. आज स्वार्थ बघा, दुनियादारी नको.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ८
पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. संधींचा फायदा घ्या.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घ्या. थोडी मानसिक बेचैनी राहील.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
आपले म्हणणे इतरांना पटावे असा अट्टहास नको. नाती जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे गरजेचे.

धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४
उद्योग-व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह नकाे. गृहिणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : भगवा| अंक : १
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.पत्नीशी एकमत राहील. क्लिष्ट कामे सोपी होतील.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ८
अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. सत्कारणी लावाल. नवोदित लेखक व नवकवींना प्रसिद्धी मिळेल.