आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 13 डिसेंबर रोजी रेवती नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. असलेले पैसे जपून वापरा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
उच्चशिक्षितांना विदेशगमनाचे वेध लागतील. महत्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

तूळ : शुभ रंग : मरून | अंक : १
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४
स्थावर इस्टेटी विषयी रखडलेली कामे गती घेतील. नव्या ओळखी होतील. मौल्यवान खरेदी कराल.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
महत्वाची कामे विलंबाने होतील. मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. भावनेच्या भरात वचने देऊ नका.

मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
नव्या ओळखीतून व्यवसायवृध्दी होईल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल. संयम ठेवा.

बातम्या आणखी आहेत...