आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारचे राशिफळ / अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

सोमवार, 14 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
जमाखर्चाचा तराजू थोडासा डळमळीत होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेफार मतभेद होणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
आज तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. आज आईचे मन दुखावू नका. कलाकारांना कामे शोधावी लागतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. भावंडांत सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
आज खिशात पैसा खेळता राहील. मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक : शुभ रंग : मरून|अंक : ८
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. इतरांवर विसंबून राहू नका. आज वाद नकोतच.

धनु : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६
काही आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. एखादी सुरक्षित गुंतवणूक करण्याचाही विचार कराल.

मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : ५
आज विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ४
कार्यक्षेत्रात काही नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागणार आहेत.

मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांचे मूड सांभाळणे कठीण होईल. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser