आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी पुनर्वसू नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल. गृहीणींना वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा येईल.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : २
तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. कायदा पाळा.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल. विवाह विषयी बोलणी होकारार्थी पार पडतील.

सिंह : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.

कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ३
व्यवसायात पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे होईल. कार्यक्षेत्रात फायदेशीर ओळखी होतील.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची आज ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. व्यवसायात भिडस्तपणा नको.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टाळा.

धनु : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. आपले मत नाही मांडलेत तरी काही बिघडत नाही.

मकर : शुभ रंग : लाल | अंक : १
आज आर्थिक स्थिती चांगली असल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. किचकट कामे सोपी होतील.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
कोणतेही निर्णय आज थोरामोठयांच्या सल्ल्यानेच घ्या. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका.

मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. गृहीणी स्वत:साठी वेळ काढतील.

बातम्या आणखी आहेत...