आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसासाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 14 जून रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. कुणाशीही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. महत्वाचे निर्णय थोरामोठयांच्या विचाराने घेणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दूरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.

सिंह : शुभ रंग : माेरपिशी | अंक : ७
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ९
आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. गृहीणींना पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : २
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : १
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाणार आहे.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.

मकर : शुभ रंग : मरून | अंक : ३
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

कुंभ: शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ६
आज तुम्ही स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. तरूणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...