आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 15 मार्च 2021 रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : २
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीकडेही लक्ष द्यावे.

वृषभ : शुभ रंग : केशरी| अंक : ५
काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. पैशाची मंदावलेली आवक पूर्ववत होईल.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. मित्र आज दिलेली अाश्वासने पाळणार नाहीत. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूरच राहा.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
काही मानापमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ६
आज तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

धनू : शुभ रंग: चंदेरी|अंक: ८
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल.ज्येष्ठ मंडळींना प्रकृती साथ देईल. सत्संगात रमाल.

मकर : शुभ रंग : सोनेरी|अंक: ३
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग जास्त होईल. भावंडांत सामंजस्य राहील.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. अनपेक्षित काही येणी वसूल होतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७
आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. आर्थिक सुबत्ता येईल व तुमची कार्यक्षमता व कामातील उत्साह वाढेल.

बातम्या आणखी आहेत...