आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात

सोमवार 15 जून रोजी रेवती नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असल्यास सोमवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : १

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या समाज हिताच्या कामात हातभार लावाल. खर्च होईल.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ८

कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांचे चीज होईल. दैव पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

व्यावसायात आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नोकरदारांना मेहनतीचे फळ मिळेल. आज स्वप्नरंजनापेक्षा कृतीवर भर देणे हिताचे राहील.

कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ७

व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी दिवस. काही अनपेक्षित अडचणी उद्भवतील. एकांताची गरज भासेल.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आज कोणत्याही प्रकारचे धाडस टाळाच. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

आज व्यावसायिक स्पर्धेस समर्थपणे तोंड देता येईल. वैवाहिक जीवनात काही सुखद क्षण अनुभवाल.

तूळ : शुभ रंग : क्रीम | अंक : १

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. येणी वसूल होतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ५

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. आज चुकीचे वर्तन केल्याने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : २

कामातील उत्साह दांडगा असेल. हौशी मंडळींना जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ४

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. छान दिवस.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : ३

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

बातम्या आणखी आहेत...