आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 16 नोव्हेंबरची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : लाल| अंक : १
कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच करा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

कर्क : शुभ रंग : चंदेरी| अंक : ५
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढ शास्त्रांकडे कल वाढेल.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
मनाजोगत्या घटनांनी मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. इतरांस मदत करू शकाल.

कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

तूळ : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज सहकुटुंब चैन करणार आहात.

वृश्चिक : शुभ रंग : मरून|अंक : ९
आज आधुनिक रहाणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

धनू : शुभ रंग : भगवा| अंक : ८
जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. प्रवास होतील.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ३
प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८
अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

मीन : शुभ रंग : मोतिया|अंक : ६
कार्यक्षेत्रात राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागेल. इतरांच्या भानगडीत डोकावू नका.