आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिथी, वार आणि नैक्षत्र स्थितीमुळे जुळून येत आहे सर्वार्थसिद्धी योग

सोमवार 17 ऑगस्ट रोजी तिथी, वार आणि नक्षत्राची स्थिती सर्वार्थसिद्धी नावाचा योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. धनलाभाचेही योग जुळून येत आहेत. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : १
क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
आज स्वत:च्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ८
तुम्हाला सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अति सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अती आक्रमकतेने नुकसान होईल.

सिंह : शुभ रंग : केशरी|अंक : ७
कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण राहील. दिवस लाभाचा.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकार गाजवाल.

तूळ : शुभ रंग : मोरपिशी|अंक : ४
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला अस्वस्थ करतील. कौटुंबिक निर्णय थोरांच्या संगनमताने घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह विषयी बोलणी आज नकोतच. गाडी हळू चालवा.

धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : २
व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. आज काही दुरावलेली नाती जवळ येणार आहेत.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत. ऐशोआरामी वृत्ती बळावेल. गृहिणी ब्युटी पार्लरसाठी वेळ काढतील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
आर्थिक आवक मनाजोगती असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावा लागेल.