आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 17 मे रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. सोमवारच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. आज गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. संततीचे विवाह जुळतील.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : १
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका.आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. खर्च वाढेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
आज म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ७
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. मित्र दगा देतील.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. कठोर बाेलून कुणाचेही मन दुखावू नका.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६
दैनंदिन कामात काही अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडेल.

धनु : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागणार आहेत. आज घरी पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : मोरपीशी | अंक : १
आज दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही काही येणी असतील तर मात्र आज वसूल होऊ शकतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

बातम्या आणखी आहेत...