आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोमवार 18 जानेवारीचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...
मेष: शुभ रंग: गुलाबी| अंक : १
नोकरदारांना वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कौटुंबिक निर्णय थोरांच्या संगनमताने घ्यावे लागतील.
वृषभ: शुभ रंग: तांबडा| अंक : ८
आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल.
मिथुन : शुभ रंग : भगवा| अंक : ७
आज फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.
कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात. थोरांचे अनुभवाचे बोल ऐकून तरी घ्यावेत.
सिंह :शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह विषयक चर्चा आज नकोतच. गाडी जपूनच चालवा.
कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. वैवाहीक जिवनांत तिसऱ्याला प्रवेश देऊ नका.
तूळ : शुभ रंग : मरून| अंक : २
कंटाळवाणा दिवस. क्षुल्लक कामातही काही अडचणींचा सामना करावा लागेल. आज तब्येतही नरमच असेल.
वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
सौंदर्य प्रसाधने व चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी वेळ देतील.
धनु : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
आर्थिक आवक पुरेशी असून परिवारात सलोख्याचे वातावरण राहील. मुले तुमच्या आज्ञेत असतील.
मकर : शुभ रंग : केशरी| अंक : १
आज तुमची एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील.
कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे आहे.
मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.