आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 19 एप्रिल रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार....

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
दैनंदिन कामातही काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. आज मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : २
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. मित्र परिवारात तुमचा शब्द अंतिम राहील.शेजाऱ्यांशी तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. व्यवसायात भागीदारांचे सल्ले मोलाचे असतील.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
आज टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत. काही देणीही आज चुकवावी लागणार आहेत.

सिंह : शुभ रंग : निळा|अंक : ८
घरात अधुनिक सुखसोयींसाठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम| अंक : २
महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या. आज ताकही फुंकूनच पिणे गरजेचे आहे.

धनू : शुभ रंग : सोनेरी|अंक : ५
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेऊ शकाल.

मकर : शुभ रंग : आकाशी|अंक : ३
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

कुंभ : शुभ रंग : लाल|अंक : १
नवोदित कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील. आवक पुरेशी असल्याने मन:स्थिती उत्तम राहील.

मीन : शुभ रंग : पांढरा|अंक : ४
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस. प्रेमप्रकरणे मनस्ताप देतील.

बातम्या आणखी आहेत...