आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

19 ऑक्टोबर सोमवारी चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहील. यामुळे आयुष्मान आणि मानस नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या लोकांना ग्रह-ताऱ्यांची मदत मिळू शकते. नवीन कामाच्या योजना तयार होतील आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचेही योग आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांना दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मोरपिशी| अंक : १
कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. नोकरदारांना दिवस कंटाळवाणा जाईल. आज एकांत हवासा वाटेल.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत श्रम करण्याची तुमची तयारी असेल. संध्याकाळी लवकर घर गाठा, जोडीदार आतुरतेने वाट पाहत असेल.

मिथुन : शुभ रंग : मरून|अंक : ३
नोकरदारांना ओव्हरटाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका.

कर्क : शुभ रंग : मोतिया|अंक : २
आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळाल. रसिक मंडळी जिवाची मुंबई करतील.

सिंह :शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
तुमच्या खर्चीक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. आज घराबाहेर वाद टाळा.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

तूळ : शुभ रंग : केशरी| अंक : ९
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान-मोठे लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ७
दैनंदिन कामे वेळच्या वेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील.

धनु : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल.

कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज ताेंड द्याल.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : १
हाती असलेल्या पैशांची उधळपट्टी नको. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. नीतिबाह्य वर्तन आंगाशी येईल. हवी. सावध राहा.

बातम्या आणखी आहेत...