आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 2 मे रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर सोमवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्य लाभेल.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार परत उलटू शकेल.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २
स्वार्थकडे लक्ष असुद्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नवीन लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.

सिंह : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घेणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ५
वैवाहिक जिवनांत जोडीदाराच्या चूका काढू नका. आज वाहन काळजीपूर्वक चालवा. गैरव्यवहार नकोत.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ४
हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. चंगळवादी वृत्ती राहील. आज दोघात तिसरा नको.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : १
व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
नोकरदार वरीष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना प्रकृती स्वास्थ लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : २
आज अथक परिश्रमांच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. दैव अनुकूल राहील.

मीन : शुभ रंग : राखाडी| अंक : २
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुलांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

बातम्या आणखी आहेत...