आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : आकाशी| अंक : १
आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

वृषभ: शुभ रंग : पांढरा| अंक : ४
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. हौशी मंडळींना जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे चालून येतील.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आज तुमची मोठया लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील. पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
व्यवसाय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावेच लागतील. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा बाळगू नका.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ७
शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

तूळ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

धनु : शुभ रंग : भगवा|अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक माघार घेतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ३
कुटुंबात आज काही मनासारख्या घटना घडतील. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.

कुंभ : शुभ रंग : क्रिम|अंक : १
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामांत उत्साह राहील. खर्चावर ताबा गरजेचा.

मीन : शुभ रंग : मरून|अंक : २
कौटुंबिक वाद असतील तर दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. महत्त्वाचे मेल्स येतील.