आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • सोमवार, 20 एप्रिल रोजी एक खास शुभ योग जुळून येत आहे

सोमवार, 20 एप्रिल रोजी एक खास शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऐंद्र नावाचा योग जुळून येत असल्यामुळे जवळपास संपूर्ण दिवस शुभ काम केले जाऊ शकतात. बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत. मौल्यवान ऐवज सांभाळा. 

  • वृषभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. काही हरवले असल्यास गवसेल. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही.

  

  • मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ६

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात. 

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

  • कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ३

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. 

  • तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल.  आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

  • धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील.  पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

  • मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील. एकतर्फी प्रेमाला समोरुन होकार मिळेल.

  • कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. आज घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

  • मीन : शुभ रंग : भगवा | अंक : १

आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.

0