आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 20 जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : २
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. मित्रांनी केलेली खोटी स्तुती आवडेल.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागेल.आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या वाढत्या मागण्या हौशीने पुरवाल. शब्दांवर मात्र लगाम असू द्या.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाव्या लागतील. काही प्रमाणात जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. कुवतीबाहेर जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका.

सिंह : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
व्यावसायिक अडचणींवर सहज मात करू शकाल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरणार आहेत.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ७
आज तुम्ही रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्यायला हवे. मित्रांना दोन हात लांबच ठेवणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर अजिबात अवलंबून राहू नका.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होऊ शकतो.

धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : २
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. आज वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा नको.

मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४
आवक पुरेशी असेल, तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. आज आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
आज तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
आज प्रिय आप्तस्वकीयांसह मौजमजेत दिवस व्यतीत होईल. आज खिशात पैसा खेळता राहील. गृहिणी मौल्यवान खरेदी करतील.