आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 20 जून रोजी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती प्रीती नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
अडचणी आज देवालाच सांगा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ९
आज तुम्ही कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. अति परखड बोलण्याने आपलीच माणसे दुरावतील.

मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : ९
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत. अनुकूल दिवस.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी कामाशिवाय फार खोलात शिरू नका. आज रुग्णांनी पथ्यपाणी सांभाळावे.

कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ८
काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. पत्नीच याग्य सल्ले देईल.

तूळ : शुभ रंग : क्रीम | अंक : २
सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ७
कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान अशक्य. आज धाडस नकोच.

धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ३
अति हुषार मंडळी संपर्कात येणार आहेत. व्यर्थ वाद घालू नका, आज डोके शांत ठेवणेच हिताचे राहील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
अती धावपळ टाळा. हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करायला हरकत नाही.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २
आवक चांगली असली तरी पैसा जपून वापरायला हवा.आज संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...