आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून आजच्या दिवशी चित्रा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग: निळा, शुभ अंक : १
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

वृषभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : १
आज हौसमौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

मिथुन | शुभ रंग: क्रिम, शुभ अंक : ३
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

कर्क | शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : ३
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

सिंह | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : २
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल.गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

कन्या | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

तूळ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ६
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

वृश्चिक | शुभ रंग:स्ट्रॉब, शुभ अंक : ७
पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

धनु | शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक : ९
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

मकर | शुभ रंग :निळा, शुभ अंक : ५
उद्योग-धंद्याच्या दृष्टीने थोडासा विराेधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार अाहे.

कुंभ | शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ८
फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी दिवस योग्य नाही. गाडी हळूच चालवा.

मीन | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ४
आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौसमौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क राहा.

बातम्या आणखी आहेत...