आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 सप्टेंबर, सोमवारी विशाखा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मित्र नावाचा शुभ योग तयार होत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने 6 राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये मिळू शकते नशिबाची साथ. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : लाल| अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. घरात जोडीदाराच्या भावना समजून घेणे हिताचे.

वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आर्थिक स्थिती उत्तम, मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. सहकुटुंब चैन व करमणुकीस प्राधान्य द्याल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

सिंह : शुभ रंग : मरून|अंक : ३
आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नेते मंडळींना अाश्वासने पाळावी लागतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी काळजी नको,पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : सोनेरी|अंक : ४
अाधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी येतील.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ५
महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच उरका. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

धनु : शुभ रंग : भगवा|अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

मकर : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रयत्नांस यश नक्की.

कुंभ : शुभ रंग : निळा|अंक : ६
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. घरात वडिलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावाच लागणार आहे. वैवाहिक जीवनात काही लाडिक रूसवे-फुगवे असतील.

बातम्या आणखी आहेत...