आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 22 फेब्रुवारीला मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
विविध मार्गाने पैसा येईल. खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. कदाचित दंतवैद्याची भेट घ्यावी लागेल.

वृषभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
आज तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून नि:स्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळेल. सज्जनांच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
कार्यक्षेत्रात आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. भागीदारी व्यवसायात देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आज अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वाहतुकीचे नियम मोडू नका.

कन्या : शुभ रंग : लाल|अंक : २
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आजी-आजोबांनी फक्त नातवंडांत रमणे हिताचे राहील.

तूळ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी कामाशिवाय फार खोलात शिरू नका. मित्र चुकीचेच सल्ले देतील. मोह टाळा.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. वादविवादात तुमचे मत प्रभावी राहील.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ९
मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
प्रॉपर्टीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजुरी होईल. यशदायी दिवस.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : १
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही जुनी तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या.

बातम्या आणखी आहेत...