आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार 22 मार्च रोजी आद्रा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर सोमवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...
मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकियात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. आज यशदायी दिवस.
वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजकार्य कराल.
मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
जागेसंबंधीत महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.
सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ५
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
इतरांच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण, तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल.
तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ४
आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात.
वृश्चिक : शुभ रंग : पिवळा | अंक : ६
कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य गरजेचे राहील.
धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील.
मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.दिवस लाभाचा असून अनेक अवघड कामे सोपी होतील. काही भाग्यवान नव्या घराचा ताबा घेतील.
कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ९
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक-जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखा.
मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ७
हट्टीपणावर मात करून आज संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.